Saturday, April 27, 2024
Homeनाशिकनिफाड येथे बंदला 100 टक्के प्रतिसाद

निफाड येथे बंदला 100 टक्के प्रतिसाद

निफाड । Nashik

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवार दि.8 रोजी निफाड तालुक्यातील बाजारपेठांसह खेडेगावात कडकडीत बंद पाळून केंद्र शासनाच्या कृषी विरोधी कायदा धोरणास विरोध करीत अनेक ठिकाणी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. निफाड येथे आमदार दिलीप बनकर यांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढून तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देत केंद्र शासनाने पारित केलेला कृषी कायदा रद्द करण्याची मागणी केली.

- Advertisement -

यावेळी बोलतांना आ. दिलीप बनकर म्हणाले की, केंद्र सरकारने हा कायदा पारित करतांना शेतकरी व कामगारांना विश्वासात घेतले नाही. हा अन्यायकारक कृषी कायदा शेतकर्‍यावर लादण्याचा प्रयत्न केला जात असून त्यास विरोध म्हणून दिल्लीच्या वेशीवर आमचे पंजाब, हरियाणामधील लाखो शेतकरी बांधव कुटुंबासह आंदोलन करीत दिल्लीकडे कूच करीत आहे.

त्यांना अडवण्याचा व आंदोलन मोडीत काढण्याचा सरकार जटील प्रयत्न करीत आहे. केंद्र सरकारने जर अशीच आडमुठी भूमिका ठेवल्यास येत्या काळात शेतकरी आंदोलनाची पार्श्वभूमी असलेला निफाड तालुका देखील मागे हटणार नाही. यावेळी उद्भवलेल्या परिस्थितीस केंद्र सरकारच जबाबदार राहील असेही आ. बनकर म्हणाले. यावेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला होता.

तहसीलदार शरद घोरपडे यांना निवेदन देत आमच्या भावना केंद्र शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी राजेंद्र डोखळे यांनी केली. यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, प्रहार संघटना पदाधिकार्‍यांसह शेतकरी, व्यापारी व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. काल मंगळवारी निफाड तालुक्यातील प्रमुख बाजारपेठांसह खेडेगावात देखील कडकडीत बंद पाळण्यात येवून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या