Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

जागतिक समुद्र दिन : भारतातील या पाच समुद्र किनाऱ्यावर असते वर्षभर गर्दी

Share

आज जागतिक समुद्र दिन. जगात वेगवेळ्या देशात समुद्रांना वेगवेगळी नावे आहेत. समुद्राची किनारे पर्यटनासाठी अधिक प्रसिद्ध आहेत.  समुद्र किनारी फिरणे, लाटा पाहात संध्याकाळी वेळ घालवणे, समुद्र किनार्‍यावरचा अनुभव हा काही वेगळाच असतो. भारतात काही खूपच सुंदर समुद्र किनारे आहेत. यामध्ये केरळ आणि महाराष्ट्रात अधिक प्रमाणत आहेत. गोवा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे थोड्याफार प्रमाणत महागाई कमी आहे. त्यामुळे याठिकाणी अधिक पर्यटक भेटी देतात.

आजच्या समुद्र दिनाचे औचित्य साधून देशातील प्रमुख पाच समुद्र किनाऱ्यांची माहिती आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. 

1. कोवालम बीच, केरळ : 

कोवालम बीच केरळ राज्यात आहे. त्रिवेंद्रमपासून 16 किलोमीटरवर मलिबार किनारपट्टीला लागून कोवालमचा किनारा आहे. एक विस्मरणीय क्षण घालवण्यासाठी या समुद्राला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. येथील लाइट हाऊस हे या बीचचे प्रमुख आकर्षण आहे. किनार्‍यावरील नैसर्गिक दगडी सजावट आणि शांत लाटा हे या किनार्‍याचे वैशिष्ट्य आहे.

2. राधानगर बीच, अंदमान :

टाईम मॅगॅझीनने आशिया खंडातील बेस्ट बीच म्हणून या बीचचा गौरव केला आहे. शुभ्र पांढरी मुलायम वाळू, तळाचा ठाव घेऊ शकणारे निळसर पाणी याठिकाणी आढळते. निसर्गाचं सौंदर्य अनुभवायला येथे एकदा नक्कीच जावे. स्कूबा डायव्हिंग, मासेमारी इत्यादीचा पुरेपूर आनंद पर्यटकांना घेता येतो.

3. तारकर्ली बीच, महाराष्ट्र :
कारली नदीचा किनारा हा अरबी समुद्राच्या साथीने जगाला सुंदरतेचा संदेश देणारा आहे. महाराष्ट्रातील मालवणमधील हा एक निर्मळ आणि सुरक्षित किनारा आहे. सूर्यप्रकाशात अगदी 20 फुटापर्यंत समुद्रतळ दिसू शकतो हे येथील वैशिष्ट्य आहे. दरवर्षी मोठी गर्दी याठिकाणी होते.
4. मेरारी बीच, केरळ :
केरळमधील आलेप्पी गावाजवळील एक सुंदर किनारा आहे. छोटे छोटे रिसॉर्ट्स, घरगुती जेवण, लुसलुशीत वाळू, लाटा ही या किनार्‍याची वैशिष्टय़े आहेत.
5. बंगाराम बीच, लक्षद्वीप :
चंदेरी वाळू, उबदार पाणी आणि नारळाची झाडे हे या किनार्‍याचं वैशिष्टय़. पावसाळ्यात हेलिकॉप्टरने बेटावर उतरण्याची सोय असलेले हे बेट जणू एक स्वर्गच आहे.  जगातील टॉप टेन किनार्‍याच्या यादीत असलेला हा छोटासा बंगाराम. स्वच्छ पाणी, रंगीबेरंगी मासे पर्यटकांना वेगळाच आनंद देतात.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!