साईबाबा पतसंस्थेच्या ठेवीदारांचे उद्यापासून उपोषण

0
साकूर (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी येथील साईबाबा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मुख्य शाखा साकूर येथील पतसंस्थेत गैरव्यवहार झाला असल्याने ठेवीदारांना ठेवी अद्यापही मिळाल्या नाही. त्यामुळे साकूर येथील भीमराज भिकाजी जाधव हे संगमनेरच्या उपनिबंधक कार्यालयासमोर सोमवार दि. 14 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण करणार आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भीमराज जाधव यांनी म्हटले आहे की, संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी येथील साईबाबा पतसंस्थेत आम्ही ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या.
परंतु त्या ठेवी वेळेत मिळत नसल्यामुळे ठेवीदारांनी 29 एप्रिल रोजी संगमनेर उपनिबंधक कार्यालयासमोर उपोषण केले होते.
उपोषणावेळी ठेवीदारांना तीन महिन्यांत 50 टक्के रक्कम देण्याचे पतसंस्थेच्या अध्यक्षांनी लेखी आश्‍वासन दिल्यानंतर ठेवीदारांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र 3 महिने उलटून गेले तरीही दिलेल्या आश्‍वासनाची 50 टक्के रक्कम मिळाली नाही.
यामुळे पुन्हा ठेवीदारांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला असून सोमवार 14 ऑगस्ट पासून संगमनेर उपनिबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे ठेवीदार भीमराज भिकाजी जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*