Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाची आजची महासभा रद्द

मनपाची आजची महासभा रद्द

Today’s NMC GBM cancelled in the wake of Corona

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

शहरात चालू आठवड्यात प्रतिदिवस सुमारे सातशेच्यावर नवीन करोना रुग्ण समोर आल्यामुळे रुग्णांत लक्षणिय वाढ झाल्याने मनपा प्रशासनांवर कामांचा मोठा ताण आला आहे. ही स्थिती लक्षात घेत प्रशासनाला तत्काळ करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काम करता यावे म्हणून आज (दि.17) रोजी सकाळी होणारी नाशिक महापालिकेची ऑनलाईन महासभा रद्द करण्यात आली आहे.

यासंदर्भात महापौर सतिश कुलकर्णी यांनी आयुक्त व नगरसचिव विभागाला पत्र देऊन मागणी केल्यानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला. नाशिक शहरात मागील वर्षात ऑगस्ट – सप्टेंबर 2020 या महिन्यात ज्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात करोना संसर्ग होऊन शहरावर मोठे संकट आले होते, अशीच स्थिती चालू आठवड्यात शहरात पुन्हा एकदा निर्माण झाली आहे.

यामुळे संपुर्ण मनपा प्रशासन कामाला लागले असून कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेेंटर व कोविड रुग्णालयांची पुन्हा एकदा पुनर्रचना केली जात आहे. अनेक तास चालणार्‍या महासभेसाठी अधिकार्‍यांना उपस्थित रहावे लागते, त्यांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून उद्याची महासभा रद्द करावी अशी मागणी महापौर यांनी आज नगरसचिव विभागाला व आयुक्त यांना पत्र देऊन केली.

या मागणीचा विचार करुन आयुक्तांनी उद्याची महासभा रद्द केली असून यासंदर्भातील पत्र नगरसचिव राजू कुटे यांनी दिले आहे. यामुळे चालु महिन्याची आजची व दि.18 फेब्रुवारी 2021 ची तहकुब महासभा या रद्द झाल्या असुन यासंदर्भातील तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या