आज नेट परीक्षा

नाशिकमध्ये प्रथमच केंद्र ११ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

0

नाशिक | दि. ४ प्रतिनिधी- नाशिक शहरात आज प्रथमच राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नेटची परीक्षा प्रथमच होत आहे. या परीक्षेसाठी जिल्हाभरातून ११ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत. सीबीएसई बोर्डाकडून या परीक्षेचे समन्वय केले जाणार आहे.

या परीक्षेसाठी गुरु गोविंद सिंग कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, के.के.वाघ ऍग्री कल्चर महाविद्यालय, कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट ऑफ सपकाळ नॉलेज हब, केंद्रीय विद्यालय ओझर, एस.एम.आर.के.ए.के.महिला महाविद्यालय, सिम्बॉयसिस स्कूल अश्‍विन नगर, गुरु गोविंद सिंग पब्लिक स्कूल, केंद्रीय विद्यालय देवळाली आणि केंद्रीय विद्यालय आय.एस.पी. नेहरू नगर या नऊ परीक्षा केंद्रांची निवड केलेली असून या केंद्रावर नेट परीक्षा होणार आहे.

या परीक्षेसाठी नाशिकला नेट सेंटर व्हावे याकरिता खा.हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले होते व त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन त्यास मान्यता मिळाली. कामाचे फलित म्हणून विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी ८:३० वा. के.के.वाघ ऍग्री कल्चर महाविद्यालय, बळी मंदिर जवळ, मुंबई-आग्रा रोड येथे खा.हेमंत गोडसे हे उपस्थित राहणार आहेत.

या आधी केवळ औरंगाबाद, मुंबई, पुणे हे परीक्षेसाठी केंद्र निश्‍चित करण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रात्रभर प्रवास करून परीक्षा द्यावी लागत होती. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ तसेच पैशांचाही अपव्यय होत होता. नाशिकला केंद्र मंजूर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळली आहे. दरम्यान परीक्षेसाठी एकूण तीन पेपर होणार असून ९ वाजल्यापासून ते सुरू होतील. परंतु परीक्षार्थींना परीक्षेआधी अर्धा तास आधी आपल्या सेंटरवर उपस्थित रहावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

*