‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर पुण्याचा अभिषेक राज्यात प्रथम

0

सीबीएसई बोर्डातर्फे नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर  करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातुन  पुण्याचा अभिषेक डोग्राने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तर नीट परीक्षेत यंदा  पंजाबच्या नवदीप सिंगने 697 गुण मिळवून  मुलांमध्ये देशात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर मुलींमध्ये निकिता गोयल अव्वल क्रमांक पटकावला आहे.

यंदा देशभरात 7 मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये  सुमारे 12 लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. यापैकी 10.5 लाख विद्यार्थ्यांनी हिंदी किंवा इंग्रजी माध्यमात परीक्षा दिली होती,

तर उर्वरित 1.25 लाख विद्यार्थ्यांनी इतर आठ भाषांची निवड केली होती. यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश होता.

नीट परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना नीटच्या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

cbseneet.nic.in 

 

 

LEAVE A REPLY

*