नाशिकमध्ये सकाळी दोन ‘चेन स्नॅचिंग’च्या घटना; पोलीस तपास सुरू

0
नाशिक | नाशिकमध्ये आज सकाळच्या सुमारास दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलीस पथक नेमण्यात आले असून तपासकार्य सुरूं करण्यात आले आहे.

आज सकाळच्या सुमारास पंचवटी आणि मुंबई नाका परिसरात अर्ध्या तासाच्या अंतराने दोन चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या.

या घटनेत हजारो रुपयांचे मंगळसूत्र ओरबाडून नेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. गुन्हेगारांच्या शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

*