Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

आजचा दिवस शिवसेनेसाठी महत्वाचा

Share
आरोपांच्या डरकाळ्या, latest News Shivsena Political Ahmednagar

नवी दिल्ली | वृत्तसंस्था

मुख्यमंत्रिपदावरून भाजपविरोधात आक्रमक झालेल्या शिवसेनेला सत्तास्थापना करण्यात अपयश आले. सेनेला राज्यपालांनी वेळ वाढवून देण्यास नकार दिला, यानंतर राष्ट्रवादीनेही सत्ता स्थापणेसाठी वेळ वाढवून मागितला मात्र, राज्यपालांनी नकार देत थेट राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केली.

सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळवण्यास अपयश आले आहे.  त्यामुळे दिल्लीत घडणाऱ्या घडामोडींमुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

महाराष्ट्रातील राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देणारी शिवसेनेची याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर आज सुप्रीम कोर्ट सुनावणी करणार आहे. कॉंग्रेस नेते कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात शिवसेनेची बाजू मांडतील. सुप्रीम कोर्टाने जर राज्यपालांच्या निर्णयाला स्थगिती दिली, तर शिवसेनेला मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे या याचिकेनंतर शिवसेनेला दिलासा मिळणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!