पाकिस्तानला योग्य धडा शिकवू : आठवले

0
नाशिक | दि.३ प्रतिनिधी- जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. पाकव्याप्त काश्मीरवर हक्क सांगण्याचा देखील पाकिस्तानला अधिकार नाही. भारतापासून काश्मीर तोडण्याची भाषा केल्यास पाकिस्तानला योग्य धडा शिकवू, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत दिला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने शालिमार येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर आयोजित कार्यक्रमात आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आरपीआय राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढे, नगरसेविका दीक्षा लोंढे, अव्दय हिरे, कार्याध्यक्ष नारायण गायकवाड आदी उपस्थित होते.

आठवले यांनी काव्यमय शैलीत भाषणाचा प्रारंभ केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदू धर्माला विरोध नव्हता. विषमता व जातीव्यवस्थेला विरोध होता म्हणून त्यांनी हिंदू धर्म सोडला. महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात मतभेद होते. परंतु घटना लिहिण्यासाठी त्यांनीच बाबासाहेबांना विनंती केली होती.

जगातील सर्वश्रेष्ठ घटना लिहिल्यामुळे देशाला विभाजनाचा कोणताही धोका नसून काश्मीर भारताचे नाक आहे. पाकव्याप्त काश्मीरवर हक्क सांगण्याचा देखील पाकिस्तानला कोणताही अधिकार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
भाजप जातीवादी असल्याचे काही लोक सांगतात.

मात्र त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंग यांचे सरकार आल्यानंतर बाबासाहेबांना भारतरत्न मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील गौतम बुध्दांना मानतात. त्यामुळे देशाला जातीयतेचा कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांिंगतले.

यावेळी देवळाली कटक मंडळाचे माजी नगरसेवक विलास पवार, गांगुर्डे यांनी आरपीआयमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी आरपीआयचे सागर जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भारत चव्हाण, दीपक डोके, दिनेश जाधव, सौरभ बोराडे, सचिन गायकवाड, चेतन जाधव, योगेश बोर्‍हाडे, प्रशांत गांगुर्डे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*