ठाणे महापालिका देणार 100 रुपयांत दहा वर्षे मोफत वायफाय

0

ठाणे महापालिका 100 रुपयात नावनोंदणी करून मोफत वायफाय सेवा देण्याच्या योजनेवर काम करीत असून, पहिल्या टप्प्यात शहरातील काही भागात ही सेवा सुरू केली जाणार आहे.

नागरिकांना महापालिकेकडे 100 रुपये शुल्क भरून नावनोंदणी केल्यानंतर पुढील 10 वर्षांसाठी मोफत वायफाय सेवा देण्याची योजना आखली आहे.

नावनोंदणी केलेल्या ठाणेकरांना 800 केबीपीएस डेटा मोफत वापरण्यास मिळेल. यापेक्षा जास्त डेटा आवश्यक असल्यास नागरिकांना महापालिकेकडे वेगळे शुल्क भरावे लागणार आहे. याशिवाय महापालिकेच्या सर्व कार्यालयांना 20 एमबीपीएस डेटा या सेवेअंतर्गत मोफत पुरविला जाणार आहे. या योजनेतून महापालिकेस वर्षाकाठी 61 लाखांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*