नाशकात चर्चा दारू दुकानाला टाळे ठोकणाऱ्या रणरागिणींची

0

नाशिक, ता. ११ : महिला शक्ती एकत्र आली तर काय घडू शकते याचा प्रत्यय काल तिडके कॉलनीतील एका दारु दुकानचालकाला आला.

सध्या नाशिक शहरात या महिलांच्या धाडसाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

भर वस्तीत दारुचे दुकान सुरू करण्याच्या पावित्र्यात असलेल्या या दुकानदाराने महिला शक्तीचा आता चांगलाच धसका घेतला आहे.

झाले असे,  लंबोदर सोसायटी, तिडके नगर येथे लवकरच दारू दुकान सुरू होत आहे. त्यासाठी दुकानदाराने भाड्याचा गाळा घेतला आहे.

काल त्याने या भागात दारू दुकान सुरू करण्यासाठी दारुच्या बाटल्यांचा ट्रक आणत गाळ्यात माल भरला. मात्र महिलांनी तो पुन्हा रस्त्याबाहेर आणून ठेवला.

विशेष म्हणजे जड क्रेट उचलताना ते फुटणार नाहीत याचीही महिलांनी काळजी घेतली. त्यानंतर या महिलांनी गाळ्याला कुलूप ठोकले.

LEAVE A REPLY

*