Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

सावधान! उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाची शक्यता

Share

नाशिक | प्रतिनिधी 

गेल्या दोन-तीन दिवसांपासून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हीच परिस्थिती आज आणि उद्या राहील अशी माहिती आज हवामान खात्याकडून  देण्यात आली आहे. त्यामुळे वादळी वारा आणि विजांपासून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने सांगितले आहे की, आज आणि उद्या दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यादरम्यान, ३० ते ४० किलोमीटर प्रती तासाने वारे वाहणार आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील बहुतेक भागात मेघगर्जनेसह वाऱ्यांनी थैमान घातले आहे. अनेक घरांचे पत्रे उडाले तर अनेक झाडे उमन्ळून पडली यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.

सकाळपासूनच जाणवणारा उकाडा आणि सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह होणार पाऊस असा काही अनुभव सध्या येथील जनता घेत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगरसह धुळे, जळगाव परिसरामध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने वर्तविली असून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!