Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

आमिरने स्वीकारली ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ फ्लॉप झाल्याची जबाबदारी

Share

मुंबई : विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शितअमीर खान ट चित्रपट ज्या उत्साहाच्या भरात प्रेक्षकांच्या भेटीला आला तिच उत्सुकता चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये मात्र दिसू शकली नाही. दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फारसे प्रभावी नसल्यामुळे आता खुद्द आमिरनेच पुढे येत एक लक्षवेधी वक्तव्य केलं आहे.

समीक्षक आणि प्रेक्षकांची या चित्रपटाने निराशा केली होती. त्याचविषयी आपली प्रतिक्रिया देत मिस्टर परफेक्शनिस्टआमिर खानने या सिनेमाच्या अपयशाची सगळी जबाबदारी माझी असल्याचे म्हटले आहे. मुंबईत स्क्रिप्ट राइटिंग संदर्भातला एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आमिरला Thugs Of Hindustan फ्लॉप झाल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा आमिरने हा सिनेमा पडल्याची जबाबदारी माझी असल्याचे म्हटले आहे. लोकांनी माझ्या सिनेमाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या होत्या मात्र मी त्या पूर्ण करू शकलो नाही हे माझे अपयश आहे.

लोकांना माझा ठग्ज ऑफ हिंदोस्तान हा सिनेमा अजिबात आवडला नाही याची पूर्ण जबाबदारी माझी आहे मी ती स्वीकारतो असे आमिरने म्हटले आहे. सिनेमा पडला यात वाद नाही तरीही काही लोकांना तो आवडला, ज्यांना तो आवडला त्यांचे मी आभार मानतो मात्र लोकांनी माझ्या सिनेमाकडून खूप मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या मी पूर्ण करू शकलो नाही याचे मला वाईट वाटते आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!