Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या राजकीय

‘ठग ऑफ महाराष्ट्र’ विरोधकांचा हल्लाबोल

Share

मुंबई – विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात भक्कम मोर्चेबांधणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक रविवारी मुंबईत सुरू झाली. मात्र या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ठग्स ऑफ हिंदुस्थानच्या धर्तीवर विरोधी पक्षांनी ठग ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. त्यामध्ये आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र लावून त्याखाली ‘ठग ऑफ महाराष्ट्र’, ‘ठगबाजीची चार वर्षे’ असे बोचरे शीर्षक दिले आहे.

शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी, राज्यातील दुष्काळी परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था, रोजगार, महागाई या प्रमुख मुद्यावर राज्यातील भाजपा-शिवसेना युतीचे सरकार गेल्या चार वर्षात अपयशी ठरले आहे. केवळ फसव्या घोषणा करून राज्यातील जनतेची दिशाभूल करणाऱ्या सरकारवर ठग ऑफ महाराष्ट्र असे म्हणत विरोधी पक्षाने जोरदार हल्ला चढविला आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीला विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!