Type to search

Featured मुख्य बातम्या

पुण्यात तीन वर्षांची चिमुकली कोरोनाबाधित

Share

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यामध्ये अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. निजामुद्दीनमधील तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाहून परतलेल्या आजोबांमुळे तिला संसर्ग झाल्याचा अंदाज आहे. आजोबांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते मंगळवारी पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल झाले होते.

त्यानंतर त्यांच्या कुटुंबातल्या तीन वर्षांच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आजोबा दिल्लीतील निजामुद्दीन येथे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाहून परतले होते, त्यांच्याकडून नातीला संसर्ग झाला आहे.

पुणे जिल्ह्यातून निजामुद्दीनला 136 तब्लिगी गेले होते. त्यापैकी 94 जण पुणे उपनगर भागातून, तर उर्वरित ग्रामीण आणि पिंपरी चिंचवडमधून होते. त्यापैकी 61 वर्षीय व्यक्ती आणि त्यांची नात अशा एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!