नाशिक जिल्ह्यातील तीन कुस्तीगीरांचा सोलापूरमध्ये डंका; पंजाबमध्ये करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

0
बेलगाव कुऱ्हे (लक्ष्मण सोनवणे) | कुस्ती क्षेत्रात कठोर परिश्रम, नियमित व्यायाम आणि ताकदीला अनन्यसाधारण महत्व आहे. इगतपुरी तालुक्यातील साकुरफाटा येथील गुरु हनुमान आखाड्याच्या 19 वर्षीय कुस्तीगीरांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर सोलापूरमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 41 किलो वजनी गटात अव्वल स्थान पटकावत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.

यश राऊत, ऋतिक गवळी व भूषण राऊत अशी या तीन कुस्तीगिरांची नावे आहेत. सुवर्ण पदक पटकावून त्यांनी इगतपुरी तालुक्यासह गुरु हनुमान आखाड्याचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. यामुळे त्यांचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक केले जात आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशासाठी प्रामाणिक सेवा करणारे वंजारवाडी येथील लष्करी जवान तथा पहिलवान ज्ञानेश्वर शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी  कुणाचीही मदत न घेता स्वतः  आर्थिक हात्भारातून व सामाजिक बांधीलकेतून कुस्तीगीरांना  शरीर संपनतेचे धडे देण्यासाठी साकुर फाट्यावर मोफत व्यायामशाळा उभारली आहे. त्यामुळे गोरगरीब कुस्तीगीर मल्ल तयार होण्यास मोठी मदत मिळाली आहे.

व्यायामशाळेचे संस्थापक मार्गदर्शक गुरू ज्ञानेश्वर शिंदे यांच्याकडे त्यांनी कुस्तीचे धडे घेतले आहेत. आणि या कुस्ती प्रशिक्षणाचा त्यांना सोलापूर येथील राष्ट्रीय स्पर्धेत चांगलाच फायदा झाला.

येत्या 12 ते 15 ऑगस्ट रोजी पंजाब येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.  त्यांच्या या यशाबद्दल आखाड्याचे संस्थापक ज्ञानेश्वर शिंदे,  व्यवस्थापक चंद्रभान शिंदे, प्रशिक्षक प्रवीण सूर्यवंशी, संदीप गायकर, महाराष्ट्र चॅम्पियन अविनाश सहाने, जुन्नरे,

महाराष्ट्र चॅम्पियन रमेश कुकडे, महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडके, ऑल इंडिया चॅम्पियन श्याम गायकर, महाराष्ट्र चॅम्पियन बंटी चव्हाण, बंटी शिंदे, सोमनाथ सहाने, शरद सहाने, अनिल लांडगे, भगवान झुंजरे, विजय जाधव, अमोल झनकर, ऋषिकेश झनकर, अंबु मांडे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

*