Type to search

Featured नाशिक मुख्य बातम्या

तीन हजार कर्मचार्‍यांचे पाच कोटींचे मानधन थकले

Share

नाशिक । प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला असला तरी लोकसभा निवडणुकीत काम केलेल्या 3 हजार कर्मचारी व तीनशे अधिकार्‍यांना अदयाप मानधन मिळालेले नाही. या कर्मचार्‍यांचे पाच कोटींचे मानधन थकले आहे. हे मानधन मिळावे यासाठी जिल्हाप्रशासनाकडून शासनाकडे पाठपुरावा सुरु आहे.

लोकशाही निवडणूका सुरळित पार पडाव्या यासाठी 30 ते 35 हजार मनुष्यबळ कार्यरत होते. त्यामुळे नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदान व निकाल प्रकिया सुरळित पार पडली. तसेच ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनची वाहतूक, निवडणूक सेवकांची वाहतूक, ज्या ठिकाणी मतदान झाले तेथील मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा पुरवणे, अंबड येथील वेअर हाऊसची डागडुजी, यंत्रांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकांचा बंदोबस्त, वाहतुकीसाठी भाड्याने घेतलेल्या वाहनांचा खर्च आदींसाठी निवडणूक शाखेला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. मागील सहा महिन्यात निवडणूक कामासाठी झालेल्या खर्चाची कोट्यावधींची देयके अदा करण्यात आली आहे.

तसेच कर्मचार्‍यांचा निवडणूक भत्ता देखील देण्यात आला आहे. मात्र, महसूलमधील वरिष्ठ अधिकारी व 3 हजार कर्मचारी यांचे 5 कोटींचे मानधन अदा करण्यात आले नाही. असे असताना या कर्मचार्‍यांवर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडणुकीसाठी जवळपास लोकसभा ऐवढेच म्हणजे 30 हजार कर्मचारी कार्यरत आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!