बडगाम जिल्ह्यात तीन अतिरेक्यांचा खात्मा

0

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलाने तीन अतिरेक्यांना आज कंठस्नान घातले. याबाबतची माहिती लष्कर सूत्रांकडून देण्यात आली आहे.

मंगळवारी रात्रीपासून सुरु असलेल्या चकमकीत अखेर आज पहाटेच्या सुमारास या दहशतवद्यांना ठार करण्यात लष्कराला यश आले.

ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आल्याचे वृत्त आहे. काल(दि.११) रात्री एका गावात सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना घेरले होते. तेव्हापासून ही चकमक सुरु होती.

LEAVE A REPLY

*