Friday, April 26, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर

पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी, मृतांची संख्या पाचवर

 सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वृद्धांचा आणि 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना बळींची संख्या आता 5 वर पोहचली आहे. तीन मृतांमधील 60 वर्षीय महिला काही दिवसांपूर्वी नायडू रुग्णालयात उपचारांसाठी आली होती. त्यांची चाचणी घेतली असता तो अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना नायडू रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांचा शुक्रवारी (दि.3 एप्रिल) रात्री घरीच मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. दरम्यान, त्यांचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल प्राप्त झाला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात निष्पन्न झाले, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

- Advertisement -

ससून रुग्णालयातच शनिवारी (दि. 4 एप्रिल) 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मधुमेह आणि उच्च रक्तदाबामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.पित्ताशयाचा त्रास होत असल्यामुळे एका 69 वर्षीय महिलेला गुलटेकडी येथील अडव्हेंटिस्ट रुग्णालयात 30 मार्च रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच रात्री त्यांचा कोरोनाबाबतचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे या ठिकाणी उपचार न करता औंध येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा आज सकाळ उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, पूर्वी कोरोना विदेशातून आलेल्या नागरिकांपासून पसरत होता. पण, आता हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे. झोपडपट्टी भागातही पसरत आहे ही खूप गंभीर बाब आहे. हे पसरू नये यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये. सुरक्षित व सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. महापौर मोहोळ यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधीपुण्यात कोरोनामुळे 24 तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे. ही चिंतेची बाब असून लोकांनी जागरूक होणे गरजेचे आहे. कोरोनाचा विखळा झोपडपट्टीच्या भागात पसरत चालला आहे. त्यामुळे प्रसार होण्याची आणखी जास्त भीती आहे. कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे आहे, असेही मोहोळ यांनी सांगितले.

सामाजिक द्वेष पसरवणार्‍या दोघांवर गुन्हा
इतर समाजाच्या नागरिकांकडून भाजी खरेदी करु नये, तसेच त्यांना आपल्या गल्लीत येऊ देऊ नका, अशा आशयाची व्हाटसअप ग्रुपवर पोस्ट टाकून सामाजिक द्वेष पसरविणार्यां सदस्यासह ग्रुप अ‍ॅडमिनवर देखील निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सुशीलकुमार सिमरुराम खैरालिया (वय 54) आणि अमित मनोज भालेराव (वय 33, दोघे ही रा. ओटा स्कीम, निगडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी पोलीस कर्मचारी विकास निलचंद दुधे यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित भालेराव हा अमित भालेराव मित्र परिवार या ग्रुपचा अ‍ॅहडमीन आहे. तर सुशीलकुमार हा त्या ग्रुपचा सदस्य आहे. सुशीलकुमार याने या व्हाटसअ‍ॅरप ग्रुपवर विशिष्ट धर्माच्या नागरिकांकडून साहित्य खरेदी करु नका. त्यांना आपल्या गल्लीमध्ये येऊ देऊ नका अशी समाजात द्वेषभावना पसरविणारी पोस्ट टाकली.
या पोस्टला ग्रुप अ‍ॅऊडमीनही जबाबदारी धरुन दोघांवर पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 153 (अ) (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आता प्रत्येक ग्रुप अँडमिनने आपल्या ग्रुपवर अशा कठीण परिस्थितीत कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट कोणी टाकणार नाही, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या