Friday, April 26, 2024
Homeनाशिकसातपूरला तीन रुग्ण करोना पॉझिटिव्ह; ११ जण होम क्वारंटाईन

सातपूरला तीन रुग्ण करोना पॉझिटिव्ह; ११ जण होम क्वारंटाईन

सातपूर | प्रतिनिधी

सातपूर परिसरात पुन्हा एकदा करोना आजाराने शिरकाव केला असून  श्रमिक नगर भागात दोन  तर पाटील पार्क येथे एक रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या दोनही रुग्णांच्या संपर्कातील 11 हाय रिस्क व शंभर लो रिस्क नागरिकांना उपचारार्थ ताब्यात घेण्यात आले.

- Advertisement -

श्रमीक नगर येथील  निर्माण वृंदावन गार्डन येथे बिल्डिंग नंबर 3 मध्ये रहात असलेल्या वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्याला व त्याच्या पत्नीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

प्रशासनाकडून इमारत क्रमांक 3 प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आली असून याठिकाणी औषध फवारणी व साफ-सफाई तातडीने करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर  कोशिरे यांनी परिसराची कसून तपासणी केली. यातून 5 हाय रिस्क जणांना उपचारार्थ ताब्यात घेण्यात आली असून 100लो रिस्क जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दुसऱ्या एका घटनेत पाटील पार्क परिसरात पेठ रोड मार्केट यार्ड येथे संपर्कात असलेल्या व्यक्ती ते रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्यांचे निवासस्थान परिसराला प्रतिबंधित करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या 5 हाय रिस्क जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.

या दोनही ठिकाणांवर विभागीय अधिकारी लक्ष्मण गायकवाड व विभागीय स्वच्छता निरीक्षक माधुरी तांबे यांनी तातडीने धाव घेत परिसरात प्रतिबंधित करण्यात आले. यासोबतच या या भागात जंतुनाशकांची फवारणी करून परिसर स्वच्छ व निर्जंतूक करण्यात आला.

परिसरातील करोना उपचार प्रमुख डॉ कोशिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय टीम  परिसरातील नागरिकांची तपासणी करीत आहेत.
औद्योगिक क्षेत्रात वैद्यकीय पथक व ऍम्ब्युलन्स आल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून कोणत्या उद्योगात करोना ची लागण झालेली आहे. याबद्दल उद्योजकांमध्ये कुतूहलही दिसून आले प्रत्यक्षात याबाबत वैद्यकीय विभागाकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या