संगमनेर दरोड्यातील तिघे जेरबंद

0
नाशिक | दि. २५ प्रतिनिधी- पेट्रोलपंपावर गावठी पिस्तूलचा धाक दाखवून सुमारे सात लाख १८ हजार रोकडची लुट करणार्‍या फरार झालेल्या तिघांना नाशिक गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने नाशिकरोड भागातून ताब्यात घेतले.
पंधरा दिवसांपुर्वी ही घटना संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर घडली होती.

या प्रकरणी पोलिसांनी महेश चिंधू ऊर्फ चिंतामण आंधळे (२३, रा. चेहेडी), महेश पांडुरंग लांडगे (२२, रा. वडगाव पिंगळा), सुमित अविनाश निरभवणे (२२, नाशिकरोड) या तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेली माहिती नूसार पोलीस शिपाई बाळा नांद्रे यांना गुप्त बातमीदाराकडून तीन इसम उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात गुन्हे शाखेच्या संपूर्ण पथकाने सापळा रचला. त्यांना तीन संशयित इसम याच भागात फिरताना दिसले. ते एका पल्सर दुचाकीवरून या भागात येऊन पिस्तूल खरेदी करणार्‍या ग्राहकाच्या प्रतीक्षेत होते. याचवेळी पथकाला खात्री पटल्यानंतर तिघांना शिताफीने अटक करण्यात आली.

त्यांची अंगझडती घेतली असता देशी बनावटीचे पिस्तूल, मॅक्झीन व गुन्ह्यात वापरलेली एक पल्सर मोटारसायकल असा एकूण एक लाख दहा हजाराचा मुद्देमाल मिळाला. पोलिसांनी या तिघांविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी काही साथीदारांच्या मदतीने पंधरा दिवसांपूर्वी संगमनेर येथील एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याची कबुली दिली आहे.

LEAVE A REPLY

*