Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedभरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत बापलेकासह तीन ठार

भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत बापलेकासह तीन ठार

शेगाव – प्रतिनिधी Shegaon

भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बापलेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना शेगाव-खामगाव रोडवर घडली. ही घटना…

- Advertisement -

दि.२८ ऑक्टोबर रोजी रात्री १०.१५ वाजता शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ घडली. माऊली कॉलेजजवळ एम.एच.२८-एएन ७२६५ ही दुचाकी उभी करून स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे वय ३०, त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे वय ५० आणि शेख रज्जाक शेख रहेमान वय ४० सर्व रा. सरकारी फैल शेगाव हे तिघे रस्त्याच्या कडेला उभे होते.

तेवढ्यात शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या एम.एच.१५-बीएन ३३४९ या स्कॉर्पिओने धडक दिली. यामध्ये स्वप्नील बावणे व मरिभान बावणे हे दोघे बापलेक जागिच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला. त्याला अकोला येथे उपचारासाठी घेवून जात असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला.

शेगाव पोलिसांनी याप्रकरणी शेख रहीम शेख रहेमान वय ५० रा. शेगांव यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ चालक सुशिल सिध्दार्थ इंगळे रा. सातेगांव ता.अंजनगाव सुर्जि याचे विरुध्द अप क्र. २८१/२० कलम ३०४ अ २७९,३३८,४२७ भादवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार संतोष टाले यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ ज्ञानदेव ठाकरे हे करित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या