Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

सिन्नर : खोदकाम सुरु असलेल्या विहिरीत क्रेनची ट्राॅली तुटल्याने एक ठार; दोघे गंभीर

Share

सिन्नर | अजित देसाई

तालुक्यातील मलढोण येथे खोदकाम सुरु असलेल्या विहिरीत क्रेनची ट्राॅली (माडी) तुटून झालेल्या अपघातात विहीर मालकासह दोन कामगार जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेतील एकाचा मृत्यू झाला असलायची माहिती समजते आहे. तर एका गंभीर जखमीस नाशिक येथे हलविण्यात आले आहे. दुसऱ्या जखमीवर सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अधिक माहिती अशी की, दुष्काळाचे तीव्र सावट असलेल्या मलढोण गावात अनेक विहिरींनी तळ गाठल्याने विहिरीच्या खोदकामाचे काम अनेक शेतकऱ्यांनी हाती घेतले आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका ६०-७० फुट विहिरीचे काम सुरु होते., विहिरी मालकासह दोन कामगारांचे दुपारचे जेवण आटोपले. त्यानंतर कामाला सुरुवात करण्यासाठी मालकासह कामगार विहिरीत क्रेनच्या ट्राॅलीने जात होते.

यातच वायर रोप तुटल्याने तिघेही विहिरीत कोसळले. त्यांच्यावर क्रेनची ट्राॅली कोसळल्याने तिघेही गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा मृत्यू झाला तर इतर दोघे गंभीर जखमी आहेत.

जखमींना ताबडतोब स्थानिक नागरिकांच्या मदतीने सिन्नर येथे हलविण्यात आले. यातील एका जखमीस नाशिक येथे हलविण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!