पाकिस्तानमधील गोळीबारात तीन भारतीय जखमी

0

पूँछ | प्रतिनिधी 

पाकिस्तानच्या सैनिकांनी शुक्रवारी जम्मू-काश्मीरमधील पूँछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर केलेल्या हल्ल्यात दोन तरुणींसह तीन भारतीय नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

नियंत्रण रेषेवरील भारतीय सैन्याच्या चौक्या तसेच नागरिकांना लक्ष्य करीत पाकिस्तानी सैनिकांनी तोफांचा मारा तसेच गोळीबार केला. पाकच्या या आगळिकीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात तीन भारतीय जखमी झाल्या आहेत.

येथील स्वाजियान सेक्टरमध्ये शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचा भंग करीत छोट्या तोफांचा मारा करीत गोळीबारही सुरू झाला होता. यात भारतीय जखमी झाले असल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्यांनी सांगिततली.

जखमींची नावे

तस्वीर अख्तर (वय १९) आणि शबिना अख्तर (वय १८) या दोघींसह अजून एक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*