नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

चांदवड तालुक्यात एकाच दिवशी दोन तर मालेगाव तालुक्यात एका शेतकऱ्याची आत्महत्या

0

नाशिक । चांदवड तालुक्यातील बोराळे येथील तरूण शेतकरी आप्पा खंडेराव जाधव (वय 32) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विज तारे

ला हात लावुन त्यांनी आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेने जिल्हयात आतापर्यंत 50 शेतकरयांनी आत्महत्या केल्याची नोंद करण्यात आली आहे.

सरकारने कर्जमाफीची घोषणा करूनही जिल्हयात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असल्याचे दिसून

येते. गेल्याच आठवडयात सरकारने जाहीर केलेल्या कर्जाच्या जाचक अटींमुळे कंटाळून शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची घटना येवला तालुक्यात घडली.

आज चांदवड तालुक्यात पुन्हा शेतकरी आत्महत्येची घटना घडल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. येथील शेतकरी आप्पा जाधव यांनी बोराळे गावाजवळील जनित्रावर चढून विद्युत तारेचा धक्का लावून घेत आपले जीवन संपविले. जाधव हे जानित्रालाच चिटकून राहिले होते. गावातील नागरिकांनी त्यांचा मृतदेह लाकडांच्या सहाययाने खाली उतरवला.

जाधव यांनी कार्यक्षेत्रातील सोसायटीकडून 2010 साली 50 हजार रुपये कर्ज घेतले होते, कर्ज भरता येत नसल्याने त्यांना नाशिक जिल्हा बँकेकडून जप्तीची अंतिम नोटीस आली होती. बँकेचे 76000 इतके सोसायटीचे कर्ज थकले असून नातेवाईकांकडून हात उसने पैसे घेतले आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, भाऊ,दोन असा परिवार आहे.


मालेगाव तालुक्यातील मौजे खाकुर्डीत शेतकऱ्याची आत्महत्या

नाशिक | सुपडू भिका पवार (वय ७३) या शेतकऱ्याने स्वतःच स्वतःचा अंतिम विधी केला त्यानंतर स्वतःच अग्निडाग देत कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपविल्याची मन हेलावून टाकणारी घटना मालेगाव तालुक्यातील मौजे खाकुर्डी येथे मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

मयत पवार यांनी सुरुवातीला स्वत:च आपल्या सरणाभोवती पाण्याची धारदेखील फिरवली होती. तसेच पायाच्या अंगठ्याला तार बांधून अग्निडाग दिला होता. अशी माहिती प्रत्यक्षदर्शीकडून मिळाली. सरण पेटल्यानंतर परिसरातील नागरीक जागे झाले. त्यांनी आरडाओरड केली.

मात्र पवार ९० टक्के भाजल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. पवार यांच्या पश्यात दोन मुले, तीन मुली आणि सुना नातवंडे असा परिवार आहे.

पवार यांच्या नावावर कुठलीही शेती नसून त्यांच्या पत्नीच्या नावे शेती असून त्या शेतीवर एक लाख वीस हजारांचा बोजा आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


शिवरे येथील वृद्ध शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

वडनेर भैरव | चांदवड तालुक्यातील शिवरे येथील शेतकरी कचरू पुंजा आहेर (वय ६५) यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मध्यरात्री ही घडली असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त होते आहे. आहेर हे वयोवृद्ध व आजारी देखील होते. ते प्रकृती खालावल्याने त्यांना वणी (ता.दिंडोरी) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.नरेश बागुल यांनी आहेर यांना मृत घोषित केले. त्यांनी विषारी औषध सेवन केल्याचे वडनेर भैरव पोलिसाना सांगितले. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, सुना असा परिवार आहे.

त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडेराव जाधव तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

*