Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

गणपतीपुळेत कोल्हापूरचे तिघे बुडाले; शोधकार्य सुरु

Share

गणपतीपुळे | वृत्तसंस्था

गणपतीपुळे येथील समुद्रात आज सकाळी दोन तरुणींसह तिघे जण बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघेही कोल्हापूरहून पर्यटनासाठी आले होते. दोघींचे मृतदेह सापडले असून, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यात येत आहे.

तिघेही जण कोल्हापुरातील कसबा बावडा येथील आहेत. ते पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आले होते. आज सकाळी ते समुद्रात पोहण्यासाठी उतरले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.

काजल जयसिंग मचले (वय १८), सुमन विशाल मचले (वय २३) आणि राहुल अशोक बागडे (वय २७) अशी मृतांची नावे आहेत. त्यातील सुमन आणि काजलचा मृतदेह सापडला मात्र अद्याप राहुलचा मृतदेह हाती लागला नसून शोधकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!