Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशकातील तिघे पुरात वाहुन गेले; गोदावरी, नंदिनी नदीत घडल्या घटना

Share

नाशिक । प्रतिनिधी

गोदावरी तसेच नंदिनी नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात शहरातून तिघे वाहून गेल्याच्या घटना आज उघडकीस आल्या आहेत. यामध्ये मुंबईनाका, गाडगेमहाराज पूल व नाशिकरोड येथील युवकाचा समावेश आहे.

नंदिनी नदीस आलेला महापूर बघतांना रविवारी (दि.4) दुपारी संजय एकनाथ वाल्हारे (40 रा.म्हाडा कॉलनी,भारतनगर) हा व्यक्ती वाहून गेला. तो पाण्यात वाहून येणार्‍या प्लॅस्टिक ड्रम पकडण्याच्या प्रयत्नात तोही वाहून गेल्याचे बोलले जात आहे.

प्रत्यक्षदर्शनिंच्या मते स्थानिकांसह जीवरक्षकांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तो हाती लागला नाही. पोलीसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत शोध कार्य हाती घेतले मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लाखलगाव जवळील कालवी येथे वालवी नदीत आज सकाळी साडेसह वाजेच्या सुमारास परसराम अनवट (45) हा शेतकरी वाहुन गेला. तो आपल्या शेतात गवत कापण्यासाठी गेला होता. पाय धुण्यासाठी नदीच्या कडेला गेला असता पाय घसरून पडल्याने तो पाण्यात पडून वाहून गेला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तर आज दुपारी गोदावरी नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला 19 वर्षीय युवक वाहून गेला. आकाश शिवाजी लोंढे (19, रा. फुलेनगर, पंचवटी) हा युवक आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास 3 मित्रांसमवेत पुराच्या पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. त्यांनी गाडगेमहाराज पुलावरून पाण्यात उड्या मारल्या. इतर तिघे बाहेर आले मात्र आकाश हा पुराच्या पाण्यासोबत वाहून केला. अग्निशाम दलाने त्याचा रात्री उशिरपर्यंत शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!