Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पिंपळगाव बसवंतजवळ भीषण अपघात; पाचोरा येथील दोन बहिणी आणि भावाचा दुर्दैवी मृत्यू

Share
पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत | वार्ताहर

मुंबई-आग्रा महामार्गावर रुग्णवाहिका आणि ट्रॅक्टरमध्ये समोर समोर धडक झाल्याने झालेल्या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रात्री नऊ वाजेच्या सुमारास पिंपळगाव जवळील शिरवाडे फाटा येथे घडला.

अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील शिरवाडे फाटानजीक असलेल्या हॉटेल गोदावरी समोर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथून रुग्ण नाशिकमध्ये घेऊन एक मारुती ओमिनी रुग्णवाहिका क्रमांक MH03 AH 4677 निघालेली होती.

वडाळीभोई गावाच्या पुढे निघालेली रुग्णवाहिका शिरवाडे फाट्याजवळ आली असतानाच समोरून विरूद्ध दिशेने एक ट्रॅक्टर क्रमांक MH 41 G 4589 यांच्यात समोरा-समोर धडक झाली. रुग्णवाहिका भरधाव वेगात असल्यामुळे रुग्णवाहिकेचा चक्काचुर झाला.

या अपघातात रुग्णवाहिकेतील अजिजाबी मोईद्दिन बागवान (वय 60), रफिऊद्दिन मोईद्दिन बागवान (वय 55) आणि कमरूबी मोहिनोद्दिन बागवान (वय 60) सर्व  राहणार पाचोरा बाहेरपुरा जिल्हा जळगाव हे जागीच ठार झाले.

तर रुग्णवाहिका चालक सागर भिकन पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये  दोन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिघांचा मृतदेह नेण्यात आले असून नातलगांना फोन करून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!