हेल्मेट हँडलला अडकवले; दोन दुचाकींच्या अपघातात तिघांचा मृत्यू, एक गंभीर

0
अपघातग्रस्त वाहन

विखरणी | राजेंद्र शेलार 

लासलगाव येवला राज्य मार्गावर काल दुपारच्या सुमारास आंबेगाव सोमठाण देश दरम्यान दोन मोटारसायकलचा समोरासमोर अपघात झाला. अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोघे मालेगाव तालुक्यातील तर एक मुलगा येवला तालुक्यातील पाटोदा येथील आहेत.

अधिक माहिती अशी की दुपारच्या सुमारास लासलगावकडून पाटोद्याकडे येणारी मोटारसायकल व येवल्याकडुन लासलगावकडे जाणारी मोटारसायकल यांच्यात समोरासमोर अपघात झाला.

या अपघातात मालेगाव तालुक्यातील सोयगाव येथील चिंतामण वाल्मिक गांगुर्डे (वय ५५) व सुनंदा चिंतामण गांगुर्डे (वय५०) या पतीपत्नीचा जागेवरच मृत्यू झाला होता.

तर येवला तालुक्यातील पाटोदा येथील ऋषिकेश भाऊसाहेब जोंधळे (२५) पियुष रामदास वरे (२०) हे दोघे या अपघातात गंभीर झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, पियुष रामदास वरे याचा रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. अधिक तपास पोलीस करत आहेत.

हेल्मेट होते पण हँडलला..

अनेक वाहनधारकांना वाहन चालवताना हेल्मेट नकोसे वाटते. कारवाईपासून सुटका करण्यासाठी काहीजण हेल्मेट हँडलला अडकवताना नजरेस पडतात. कालच्या अपघातातीलदेखील घटना अशी काहीशी होती. दोन्ही वाहनांपैकी एका मोटरसायकलच्या हँडलला हेल्मेट अडकवलेले होते जर हेच हेल्मेट डोक्यावर असते तर किमान एकाचातरी जीव वाचला असता अशीच चर्चा परिसरात आहे.

LEAVE A REPLY

*