Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

पुणे-नाशिक महामार्गावर अपघात, तीन ठार

Share

घारगाव | (वार्ताहर)

पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी (३० एप्रिल) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली.

हा अपघात ईतका भयानक होता की मोटारसायकली वरील तिघांच्याही डोक्याचा अक्षरशा चेंदा मेंदा झाला होता. त्यामुळे महामार्गावर रक्ताताचा सडा पडला होता काही वेळ वाहूतकही ठप्प झाली होती.

घारगाव पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी धाव घेतली व ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातात ठार झालेल्या तिघांपैकी सुनील अंकुश खरात (रा. घोडेगाव, पुणे) येथील एक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून ठार झालेले इतर दोघे नेमकी कुठले आहे ते मात्र समजू शकले नाही.

घारगाव पोलीस इतर दोन मृतांची ओळखल पटवत असून त्यांचे मृतदेह संगमनेर कॉटेज हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात आले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!