Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

दिंडोरीत अपघात; तिघांचा मृत्यू

Share
नांदगाव : पोटच्या मुलीचा बापासमोर मृत्यू तर पत्नीने दवाखान्यात सोडला जीव Nandgoan Wife and Daughter Dead in Eicher-Motorcycle Accident

दिंडोरी | प्रतिनिधी

दिंडोरी येथील मोटारसायकल अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. गुजरातला जोडणाऱ्या नाशिक कळवण रस्त्यावरील स्वामी समर्थ पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली. अपघातात ठार झालेल्यांमध्ये दोघे ढकांबे येथील तर एकजण वणी येथील असल्याचे समजते. अवघ्या १८ वर्षांच्या मुलांचा या अपघातात मृत्यू झाल्याने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये संकेत माणिक बोडके (वय -18 ) व महेश संतोष गांगोडे( 18) दोघे राहणार ढकांबे तर संदीप खंडू गांगुर्डे रा. वणी माळेदुमाला यांचा समावेश आहे.

अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघात दोन्ही मोटारसायकलमध्ये झाला असून दोन्हीही वाहने भरधाव वेगाने असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शिने दिली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!