अमेरिका : कोलोरॅडोमधील वॉलमार्टमध्ये गोळीबार, दोन जण ठार

0

अमेरिकेतील कोलोरॅडो येथील डेन्व्हर उपनगरातील एका वॉलमार्टमध्ये अज्ञाताकडून गोळीबारात करण्यात आला आहे. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

वॉलमार्ट दुकानात गोळीबार सुरु असल्याची माहिती बुधवारी संध्याकाळी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हल्लेखोराचा शोध घेत आहेत.

या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

नागरिकांनी या परिसरापासून दूर रहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*