Wednesday, May 8, 2024
Homeनगरअकोले तालुक्यातील 9 गावात तीन कोटींचा अपहार

अकोले तालुक्यातील 9 गावात तीन कोटींचा अपहार

अहमदनगर (प्रतिनिधी) – अकोले तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींमध्ये गेल्याकाही वर्षापासून तीन कोटी रुपयांचा अपहार झालेला आहे. झालेल्या अपहार प्रकरणी संबंधीत ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासोबतच त्यांच्याकडून अपहाराची रक्कम भरून घेण्यास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी टाळाटाळ करत आहेत. या प्रकरणाची चौकशीसाठी नेमलेल्या पारनेरच्या गटविकास अधिकार्‍यांकडून चौकशी झालेली नाही, या प्रश्‍नावर सदस्या सुष्मा दराडे आक्रमक होत्या. अखेर अध्यक्षा शालीनीताई विखे पाटील यांनी दराडे यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची नियुक्ती केली.

शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अकोले तालुक्यातील सदस्या दराडे यांनी राजूर, शेणीत, अंबेअधोरी, बारी, केळी, तिरडे, कोतुळ, आबीतखिंड आणि पळसुुंदे या ठिकाणी ग्रामसेवकांनी तीन कोटी रुपयांचा अपहार केला असल्याचा आरोप केला. या प्रकरणी गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर उपयोग झाला नाही. या प्रकाराच्या चौकशीसाठी पारनेरच्या गटविकास अधिकारी यांची नेमणुक करण्यात आली. त्यांनी संंबंधीत गावात न जाता अकोले पंचायत समितीत बसून चौकशीचा अहवाल तयार केला. याबाबतचे पुराव दराडे यांनी सभेत देवू केले. मात्र, सभा संपाल्यावर संबंधीत अधिकारी यांच्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एस.पाटील यांच्या कार्यालयात चर्चा करण्याचा प्रस्ताव अध्यक्षा विखे यांनी दराडे यांच्यासमोर ठेवला. मात्र, दराडे तयार झाल्या नाही. अखेर दराडे यांच्या आरोपांची चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांची नियुक्ती केल्याची घोषण करण्यात आली.

- Advertisement -

यावेळी सभासभेत पारनेरच्या गटविकास अधिकार्‍यांनी या प्रकरणारची त्रोटक चौकशी झाल्याचे मान्य केले. त्यावर सदस्य देशमुख आक्रमक झाले. आम्ही सभेत जेवण करण्यासाठी येत नाहीत. अकोले तालुक्यातील एका पाझर तलावाच्या दुरूस्तीच्या नावाखाली 34 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी अनिल कराळे यांनी दराडे यांची बाजू लावून धरली. सभेनंतर दराडे यांनी सर्वसाधारण सभेसाठी या विषयाचा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने संबंधीत ग्रामसेवकांवर कारवाई प्रस्तावित केली.

राजूर ग्रामपंचायतींचे तत्कालीन ग्रामसेवक याच्यावर कारवाई केेल्यानंतर त्याचे अधिकार न गोठविल्याने त्यांने निलंबित कालावधीत राजूर ग्रामपंचायतींच्या खात्यातून 5 लाख 55 हजार रुपये काढल्याचा आरोप त्यांनी केला. अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे दोषी ग्रामसेवकांना पाठीशी घालत आहेत. त्यांचे संबंधतांसोबत आर्थिक संबंध आहेत. गटविकास अधिकारी यांनी कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण न घेताच लाखो रुपये काढून घेतले आहेत. ते विस्तार अधिकार्‍यांच्या नावावर प्रशिक्षणाचे पैसे काढत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या