Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : दावणीला बांधलेल्या तीन म्हशी, वाड्यातील १४ शेळ्या, ६ बोकड चोरीला; चिंचगव्हाण व पाडळदे येथील घटना

Share

नाशिक | प्रतिनिधी 

मालेगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे दावणीला बांधलेल्या तीन म्हशी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसर चोरट्यांच्या दहशतीखाली आहे. याठिकाणी ग्रामीण पोलिसांनी रात्रीच्या सुमारास गस्त घालावी अशी मागणी केली जात आहे.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चिंचगव्हाण येथे एकनाथ छगन पवार यांची शेती आहे. याठिकाणी त्याचा एक गोठा असून यामध्ये तीन म्हशी बांधलेल्या होत्या. रविवारी मध्यरात्री ते सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गोठ्यातील बांधलेल्या तिन्ही म्हशी चोरून नेल्या. सकाळी पवार यांनी जेव्हा गोठ्यात बघितले तेव्हा ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी पवार यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथील शेतकरी विजय खंडू निकम यांच्या वाड्यात ४० हजार रुपये किंमतीच्या १४ शेळ्या व २० हजार रुपये किमतीचे ६ बोकड बांधलेले  होते.

काल दुपारी तीनच्या सुमारास वाड्यात अज्ञात व्यक्ती शिरून त्याने शेळ्या चोरून नेल्या आहेत. याप्रकरणी खंडू निकम यांनी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!