Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

पंचवटी : म्हसरूळ परिसरातील वाहने जाळपोळ प्रकरणी तिघांच्या मुसक्या आवळल्या

Share

पंचवटी | वार्ताहर

म्हसरूळ परिसरातील वाढणे कॉलनी परिसरात गेल्या आठवड्यात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात संशयितांनी सोसायटीच्या समोर उभ्या केलेल्या तीन दुचाकी पेटवून दिल्याची घटना झाली होती. दरम्यान, याप्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहे.

म्हसरूळ परिसरात काही महिन्यांपूर्वी दहशत निर्माण करण्याच्या हेतूने वाहन तोडफोड आणि जाळपोळ करण्याच्या घटना झाल्या होत्या. अश्यातच मागील आठवड्यात वाढणे कॉलनी परिसरातील रितीश भाऊसाहेब लाटे (वय.२४ रा.फ्लॅट नं.६, भास्कर सोसायटी, वाढणे कॉलनी) यांची सुझुकी आक्सेस एम.एच.१५ जि टी ७४९१ , त्यांचा भाऊ रवी लाटे याची एम. एच.१४ सी सी ४९५२ आणि गणेश छगन खैरनार यांची हिरो होंडा सी डी डीलक्स एम.एच.१५ एफ पी ८३६१ आदी वाहने अज्ञात समाजकटकांनी गुरुवारी(दि.१८) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जाळून टाकली होती.

यानंतर म्हसरूळ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर अज्ञात संशयितांच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी देखील अशा घटना झालेल्या असल्याने परिसरातील नागरिक भयभीत होते. त्यामुळे म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी ही घटनेकडे गांभीर्याने लक्ष केंद्रित करीत तपास सुरू केला असता यात संशयित परेश उर्फ भावड्या दिलीप पाटील (वय.२३, रा. शिवाजी चौक, मोरडे गल्ली, म्हसरूळ), आकाश मोहन इंगळे(वय.१९ रा.सूर्यवंशी गल्ली, महसुळ गाव), नितीन रमेश चतुर(वय.२३ रा.,मारुती मंदिराजवळ, म्हसरूळ गाव) यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने त्याना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यानीच वाहने जाळल्याची कबुली दिली.

तसेच काही महिन्यांपूर्वी सावरकर गार्डन परिसरात चारचाकी वाहने फोडली असल्याची माहिती दिली. या तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहे.

म्हसरूळ परिसरात तीन वाहनांची जाळपोळ; आपापसातील वादातून प्रकार

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!