गणुरच्या ग्रामपंचायत सदस्यास जीवे मारण्याची धमकी

0
गणुर वार्ताहर | गणुर ता. चांदवड येथील ग्रामपंचायत सदस्य रामदास ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चांदवड येथील तहसील कार्यालय आवारात घडली.

रामदास ठाकरे हे आपल्या खाजगी कामानिमित्त तहसील कार्यालयात गेले असतांना तेथे रतन शेलार राहणार चांदवड याने तू माझी गाडी पोलिसांना पकडून दिल्याचे सांगत माझ्या नादी लागशील तर मुडदा पाडेल अशी भाषा वापरत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत रामदास ठाकरे यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार नोंदविली आहे.

दरम्यान, रामदास ठाकरे हे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत. ग्रामपंचायत सदस्याला दिलेल्या धमकीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे परिसरात फावले असून त्यांचा बंदोबस्त करण्यात मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*