वुमन वॉकथॉन स्पर्धेत हजारो महिलांचा सहभाग

0
नाशिकरोड | प्रतिनिधी- येथील माहेश्‍वरी बहु मंडळ व शिखरस्वामिनी महिला मंडळातर्फे आयोजित वुमन वॉकथॉन स्पर्धेत विविध वयोगटातील हजारो महिलांनी सहभाग घेतला. नाशिकरोड परिसरात प्रथमच अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

महापालिकेच्या शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर सकाळी साडेसहा वाजता मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत बर्‍याच महिला प्रथमच सहभागी होत असल्याने सर्वाच्या चेहर्‍यावर कुतुहल दिसून आले. तीन किमी स्पर्धेसाठी सुराणा हॉस्पीटल, अनुराधा थिएटर, दुर्गा मंदीर, बिटको चौक, दत्तमंदिर रोड मार्गे इगल स्पोर्ट क्लब येथे शेवट झाला. तर पाच किमी स्पर्धा सुराणा हॉस्पिटल, दुर्गा मंदिर, बिटको चौक, दत्तमंदिर चौक, स्टार झोन, तरण तलाव, स्वामी समर्थ मंदीर मार्गे इगल स्पोर्ट क्लब येथे शेवट झाला.

तीन किमी स्पर्धेत शिल्पा स्वान, कविता निरभवणे, डॉ. प्रांजल गांगुर्डे तर पाच किमी स्पर्धेत ज्योती उगले, डॉ.पमिता सुराणा, सुनीता वाघ हे विजेते ठरले. पंचेचाळीस वयोगटातील स्पर्धेकांसाठी तीन किमीचे तर पंचेचाळीस वर्षांच्या पुढील वयोगटातील स्पर्धकांसाठी पाच किमीचे अंतर होते. सहाय्यक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, अंबड पोलीस ठाण्याचे वपोनि मधुकर कड, उपनगर पोलीस ठाण्याचे वपोनि प्रभाकर रायते, ज्योती वाकचौरे, माधवी मुठाळ, कोमल सोमानी, माहेश्‍वरी मंडळाच्या अध्यक्षा निशा सोमाणी, शिखरस्वामिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा व नगरसेविका संगीता गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. दरम्यान यावेळी वेगवेगळया स्पर्धेत यश मिळविणार्‍या अश्‍विनी देवरे, नलिनी कड, नुपूर गुप्ता आदींचा सत्कार करण्यात आला.

यशस्वीतेसाठी कविता राठी, अलका कारवा, वर्षा कलंत्री, दिपा बुब, शारदा कासट, सारिका करवा, पूनम राठी सिमा कासट, अवंती भुतडा, प्रीती बुब, कविता लाहोटी, दर्शनी चांडक, अर्चना लोया, स्नेहा झवर, वर्षा सोमानी, रीटा मंत्री, मिनल बियानी, आशा गोडसे, प्रीती ढोकणे, अरुणा सूर्यवंशी, अनिता पाटील, शुभांगी सावजी, कंचन चव्हाण, सारीका सगर, मनिषा गायकवाड, भक्ती शिंदे, प्रतीक्षा वालझाडे, अर्चना मुठाळ, विद्या सोनार, आरती आहीरे, मनिषा नेरे आदींसह शिखरस्वामिनी व माहेश्‍वरी मंडळाच्या सदस्या प्रयत्नशील होत्या.

LEAVE A REPLY

*