…‘त्या’ धर्मादाय संस्थांची नोंदणी होणार रद्द

0
विशेष अभियान राबवण्याची धर्मादाय उपआयुक्तांची माहिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- गतपाच वर्षांचा हिशोब पत्रक, फेरफार अहवाल, लेखे सादर केलेले नाहीत अशा धर्मादाय संस्थांच्या विश्‍वस्तांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. ही नोंदणी रद्द करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती नगरच्या धर्मादाय उपआयुक्त शेळके यांनी दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्‍वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 22 (3) नुसार धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या निर्देशानुसार ज्या विश्‍वस्त मंडळाची सर्व महितीची पूर्तता झालेली नसेल किंवा विश्‍वस्त मंडळाचे निवड बेकायदेशीर झालेले असेल किंवा विश्‍वस्त मंडळाची मालमत्ता नष्ट केल्यामुळे अथवा विश्‍वस्त मंडळ रद्द करण्यास योग्य असेल तसेच विश्‍वस्त मंडळ कोणतेही कार्य करीत नसल्याचे आढळून असल्यास अशा विश्‍वस्त मंडळाची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
ज्या धर्मादाय संस्थांना आपल्या विश्‍वस्त मंडळाची स्वतःहून नोंदणी रद्द करावयाची असेल अशा मंडळांनी आपल्या संस्थेची मुळ संस्था नोंदणी प्रमाणपत्र व न्यास नोंदणी प्रमाणपत्र ठरावासह दाखल केल्यास नोंदणी रद्द होणार आहे. यासाठी त्यांनी धर्मादाय उपआयुक्त कार्यालय सावेडी, नगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*