निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ट्विटरचे ‘Ads Transparency Center’ भारतात असे काम करेल

0

नवी दिल्ली | प्रतिनिधी

देशातील लोकसभा निवडणुका लक्षात घेता ट्विटरने एक पाऊल पुढे सरकत लवकरच जाहिरात पारदर्शकता केंद्र भारतात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, देशातील सुशिक्षित उच्च पदस्थ व्यक्ती आज ट्विटर वापरताना दिसून येतात. त्यामुळे त्यांचा कल कशाप्रकारे आहे, हेदेखील तपासण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

ट्विटर निवडणुकीच्या जाहिरातदारांना ग्राफिक्सच्या माध्यमातून टार्गेट केलेल्या युजर्सपर्यंत जाहिरात पोहोचविण्याचे कार्य करणार आहे.

यामध्ये शेवटच्या सात दिवसांत किती जाहिराती करण्यात आल्या याबाबत युजर्स माहिती घेऊन शकतील. यासाठी ट्विटरने एक डशबोर्ड तयार केला असून त्यातून ही माहिती मिळणार आहे.

जर ट्विटरवरील युजरला जाहिरात नको असेल तर ती रिपोर्ट केल्यास ट्विटर ही जाहिरात काढून घेऊ शकते. काढून घेतलेली जाहिरात २४ तास ट्विटरच्या जाहिरात पारदर्शकता केंद्रात असेल त्यानंतर ती अपोआप निघून जाईल असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

भारतात या राजकीय जाहिराती निवडणुकीच्या विशेष धोरणांतर्गत बांधील राहतील असे सांगत याबाबतची माहिती, बिलाची माहिती, खर्च तसेच प्रत्येक ट्वीटमधून कशाप्रकारे जाहिरातीला प्रतिसाद मिळाला याबाबतची माहिती मिळणार आहे.

ट्विटरकडून पाठविण्यात आलेल्या जाहिरातींना कशाप्रकारे प्रतिसाद मिळाला. देशात ट्रेंड काय सांगतो आहे. सरकारविषयी उच्च पदस्थ नागरिक काय विचार करत आहेत. याबाबतची माहिती ट्विटर युजर्सला आणि संबंधित राजकीय व्यक्ती किंवा पक्षाला देणार आहे.

यासाठी एक वैयक्तिक खाते सुरु करावं लागेल. या खात्याला ट्विटरकडून योग्य ती परवानगी दिली जाईल. त्यानंतर त्याच खात्यावरून माहिती, जाहिराती प्रमोट करता येणार आहेत.

जाहिरात पारदर्शकता केंद्रासाठी कुठलेही खाते किंवा लॉग इनची आवश्यकता नसल्याचे ट्विटरने सांगितले आहे. यात फक्त अधिकृत परवानगी मिळालेले जाहिरातदार जाहिराती अपडेट करू शकणार आहेत.

राजकीय जाहिरातदारांनी यासाठी अर्ज करणे महत्वाचे असून त्यांनी अधिकृत परवाना आताच घेऊन टाकावा असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*