Friday, May 3, 2024
HomeUncategorizedPodcast News : अफू लागवड ; पोलीस कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी...

Podcast News : अफू लागवड ; पोलीस कारवाई संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिली ही माहिती

जळगाव – jalgaon

चार बिघे शेतात चक्क (Opium) अफूची लागवड झाल्याची घटना उघडकीस आल्याने आज संपूर्ण राज्यभर जळगाव जिल्ह्याचीच चर्चा सुरू आहे. सततची नापीकी व कर्जबाजारीपणा यामुळे (chopada) चोपडा तालुक्यातील वाळकी येथील तरूण शेतकऱ्याने (Farmers) शक्कल लढवत चार बिघे शेतात अफूची लागवड केली, कुणाला समजू नये म्हणून या शेताच्या आजूबाजूला मका पिकाची लागवड केली आज सद्यस्थितीत मक्याचे पिक चांगलेच मोठे झाले असून याआड अफूचे शेत बाहेरून दिसत नाही मात्र मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस विभागाने याठिकाणी धाड टाकून सर्व प्रकार उघडकीस आणला. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे (Superintendent of Police Dr. Pravin Mundhe) व चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पो.अ. व कर्मचारी यांनी कारवाई केली याबाबतची जिल्हा पोलीस अधिक्षकांनी दिलेली हि माहिती….

- Advertisment -

ताज्या बातम्या