Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : वीज पडून तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू; सोनज येथील घटना

Share

मालेगाव | प्रतिनिधी

शहर व परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह वीजांचा कडकडाट सुरु असतांना तालुक्यातील सोनज येथे अंगावर वीज पडल्याने सातवीत जाणारा तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बिपीन दशरथ घोंगडे असे मृत बालकाचे नाव असून त्यांच्या मृत्यूने सोनज सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सोनजसह परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह रिमझिम पावसाला सुरुवात झाली. घोंगडे कुटुबिय शेतात वास्तव्यास असून नुकताच शाळेतून आलेला बिपीन घराच्या वरच्या स्लॅबवरील खिडकी बंद करण्यासाठी घराच्या छतावर गेला होता.

त्याचवेळी जवळच विज पडल्याने बिपीनचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून बिपीन शाळेत देखील अतिशय हुशार विद्यार्थी होता, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली. दरम्यान वीज पडून बालकाच्या मृत्यूने सोनज गावावर शोककळा पसरली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!