Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : १३ महिन्यांच्या चिमुरडीचा ब्लेडने वार करून खून?

Share

पंचवटी : वार्ताहर 

शहरातील आडगाव नाका परिसरात एका १३ महिन्यांच्या चिमुरडीचा ब्लेडने वार करून खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्ती घरात शिरून मुलीला मारून गेल्याचे चिमुरडीच्या आईने म्हटले आहे. तर पोलीस सूत्रांनी ही घटना संशयास्पद असून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले आहे.

अधिक माहिती अशी की, येवला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता मुकेश पवार हे पत्नी आणि दोन मुलांसह औरंगाबाद रोड येथील सेलिब्रेशन लॉन्स समोरील साई पराडाईज, फ्लॅट क्रमांक ८ मध्ये दुसऱ्या मजल्यावर राहतात.

आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास राहत्या घरी अज्ञात व्यक्ती घरात शिरून मुलीला मारून गेल्याचे मुलीच्या आईने  म्हटले आहे. तर आईच्याही हातावर ब्लेडचे ओरखडे असल्याचे समजते. यामुळे हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.

या घटनेत मुलीच्या गळ्यावर ब्लेड वार करण्यात आले असून यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. मुलीच्या आईने मुलीला दवाखान्यात नेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

मुलीच्या आईलाही ब्लेडचे ओरखडे लागल्यामुळे संपूर्ण घटना संशयास्पद असून पोलीस तपास सुरु असल्याची माहिती  सूत्रांनी दिली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!