Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्यातिसरी लाट-सक्षम सामना

तिसरी लाट-सक्षम सामना

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोनाचा Corona संसर्ग वेगाने वाढत आहे. तिसरी लाट सुरु झाली असून जानेवारी महिन्याच्या शेवटचा आठ्वड्यात रुग्णसंख्या उच्चांक गाठेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या काळात लोकांनी कशी काळजी घ्यावी यासंदर्भात डॉ. सुधीर संकलेचा Dr. Sudhir Sankalecha, डॉ. कविता गाडेकर Dr. Kavita Gadekar आणि डॉ. वैभव पाटील Dr. Vaibhav Patilयांनी केलेले मार्गदर्शन.

- Advertisement -

मास्क वापरतांना

शक्यतो तीन लेयर्स मेडिकल मास्क. किंवा डबल. वापरता आला तर एन-95 बेस्ट.

मास्क टाकून देताना

मास्क फेकण्याआधी त्याचे दोन तुकडे करावेत. तो एका कागदी पिशवीत भरून ती पिशवी बंद करावी. आणि 72 तासांनी तो रीतसर घंटागाडीत टाकावा. नंतर हात स्वच्छ धुवावेत.

गरोदर महिलांची काळजी

त्यांच्या डॉक्टरच्या नियमित भेटी टाळू नयेत.

प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना मास्क वापरावाच.

संतुलित आहार घ्यावा. शरीराचे हायड्रेशन राखावे.

संसर्ग होऊन नये यासाठी गर्दीचे ठिकाण टाळावे.

किरकोळ जरी इन्फेक्शन झाले तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ज्या गरोदर मातांना बीपी किंवा मधुमेह असेल तर विशेष काळजी घ्यावी.

गरोदर मातांना करोना लस घेण्यास सरकारने परवानगी दिली आहे. तेव्हा लस टोचून घ्यावी.

लहान मुलांची काळजी

मुले सध्या घरीच आहेत. त्यांनी संतुलित आहार घ्यावा आणि व्यायाम करावा.

बर्‍याच मुलांना सौम्य संसर्ग होतो आणि तो बराही होतो.

अशा मुलांनी मास्क वापरावाच. नाक आणि तोंडाला वारंवार हात लावू नये.

हायड्रेशन आणि विश्रांती तितकीच महत्वाची.

ज्येष्ठांची काळजी

त्यांची नियमित औषधे सुरूच ठेवावीत.

गर्दीत जाणे टाळावे.

बुस्टर डोस घ्यावा.

नियमित निर्बंध पाळावेत.

रुग्णाचे आयसोलेशन/विलगीकरण

घरात शक्यतो वेगळी खोली असावी.

त्याने वापरलेली भांडी नीट स्वच्छ करावीत.

त्याने वापरलेले मास्क कागदात गुंडाळून घंटागाडीत दिले तरी चालतील.

सध्याच्या विषाणूचे बरेच रुग्ण घरीच बरे होतात. पण स्वतःहून कोणत्याही तपासण्या करू नयेत. औषधेही घेऊ नयेत.

तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपचार सुरु ठेवावेत.

वारंवार शंभरपेक्षा ताप जास्त असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, सॅच्युरेशन 93 टक्क्यांपेक्षा कमी असेल, छातीत दुखत असेल किंवा प्रेशरसारखे फीलिंग असेल, तीव्र प्रमाणात थकवा जाणवत असेल किंवा अंगदुखी असेल तर त्वरित डॉक्टरांना भेटावे.

सध्याचे गृह विलगीकरण 7 दिवसांचे

घरच्यांची काळजी

सर्वानीच सकरात्मक राहावे.

यावर्षीची लाट असे दाखवते की करोना लसीमुळे प्रतिकारक्षमता विकसित होत आहे. त्यामुळे हा आजार सौम्य स्वरूपाचा आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ कमीच येते आहे. त्यामुळे चिंता नको पण काळजी घ्या.

रुग्णाने घरी संपूर्ण आयसोलेशन पाळावेच. घरातील इतरांना लक्षणे जाणवली तर टेस्ट करून घ्यावी.

तोपर्यंत इतरांशी संपर्क टाळावा.

रुग्णाचा आहार

संतुलित आणि ताजा असावा.

व्हिटॅमिन सी युक्त फळे खावीत.

कामाच्या ठिकाणची काळजी

तीन निर्बंध- मास्क, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर

लसीकरण करून घ्यावे.

टेस्ट बाबत- अँटीजेन किंवा आरटीपीसीआर

ज्यांना त्रास होत असेल त्यांनी त्वरित

टेस्ट करावी.

शक्यतो आरटीपीसीआर

आणि डॉक्टरांना भेटावे

वाफ कशी आणि किती वेळा

दिवसातून जास्तीत जास्त 3-4 वेळाच.

एका वेळी 2-3 मिनिटेच.

डॉक्टरांचा सल्ला

सल्ला घ्यायला उशीर नको.

सौम्य लक्षणे असआणि दैनंदिन व्यवहार

सौम्य लक्षणे असल्यास डॉक्टरांच्या सल्याने औषधे घ्यावी.

डॉक्टरांच्या सल्यानुसार टेस्ट करावी. आणि रिपार्ट येईपर्यंत दैनंदिन व्यवहार करु नये.

घरी विलगिकरण पाळावे

ज्यांना लक्षणे नाहीत त्यांनी टेस्ट करण्याची गरज नाही.

स्कॅनची गरज

हा निर्णय डॉक्टरांनीच घ्यावा. रुग्णाने स्वतःहून घेऊ नये.

सध्याच्या प्रचंड थंडीत

गरम कपडे वापरावेत.

साधे पाणी प्यावे. पण शक्य असेल तर कोमटच पाणी प्यावे. गरम नको. कोमट म्हणजे शरीराच्या तापमानापेक्षा थोडेसेच जास्त.

या दिवसात घरच्या घरी उपचार

डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.. पण सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी आणि ताप याचे सौम्य लक्षण असल्यास ते देखील 48 ते 72 तास राहण्याची शक्यता असु शकते त्यामुळे औधधे डॉक्टरांच्या सल्यानेच घ्या.

रक्ताच्या चाचण्या

सौम्य लक्षणे असल्यास चाचण्या करण्याची आवश्यकता नाही.

3 दिवसानंतर ताप येतच असल्यास सी.बी.एस व सी.आर.पी. ह्या दोनच तपासण्या कराव्यात.

संसर्ग आणि करोना लस

एकही डोस घेतला नसेल तर संसर्ग झाल्याच्या महिन्यानंतर लस घ्यावी.

सध्याचा व्हेरियंट

अतिशय सौम्य. सामान्यपणे च बघावे, योग्य ती काळजी घेतल्यास लवकर बरा होऊ शकतो.

को-मॉरबीडीटी आणि काळजी

कोव्हिड 19 – मास्क, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर व लसिकरण प्रोटोकॉल पाळावा.

लसिकरण करावे

सुरक्षित आहे. लस घेतल्यानंतर फारसा त्रास होत नाही मात्र रिअ‍ॅक्शन झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- Advertisment -

ताज्या बातम्या