बंम,बंम भोले जयघोषाने शिवमंदिरे दूमदुमली; सोमेश्वरसह, कपालेश्वर मंदिरात भाविकांची रिघ

0
नाशिक । जय जय शिवशंकर… हर हर महादेव…बंब – बंम भोले… या जयघोषाने सोमेश्वर, कपालेश्वर, नीलकंठेश्वर, सिद्धेश्वर, अर्धेनारिनटेश्वर आदी महादेव मंदिरात शिवभक्तांनी परिसर दणाणून सोडला. शिव आराधना गिते, शंक, डमरूचा नाद आणि भाविकांचा जयघोष यामूळे तिसरा श्रावणी सोमवार भक्तीभावाने न्हावून निघाला.

काल रात्रीपासूनच त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी नाशिकमधून लाखो भाविक रवाना झाले होते. त्यासाठी एसटी महामंडळाने मेळा बसस्थानक, निमानी बस स्टॅन्ड आणि नाशिकरोड येथून सूमारे 300 जादा गाड्यांची व्यवस्था शिवभक्तांसाठी केली होती.

मात्र, शहरातील शिवमंदिरेही रात्रीच विद्युत रोषणाई, परिसर सुशोभिकरण आणि भक्तीगितानी भारून गेली होती. त्यामूळे मध्यरात्रीपासूनच कपालेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. त्यासाठी थेट रामकुंड परिसरात शिवभक्तांची रिघ लागलेली होती. रांगेत भक्तांनी महादेवाच्या जयघोष सुरुच ठेवलेला होता. कपालेश्वर मंदिरात दर्शन, दूधाचा अभिषेक करण्यासाठी गर्दीने कळस गाठला होता. या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. तसेच रामकुंडाकडे वाहनांना प्रवेश बंद करून वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली होती.

रामकुंडावर स्नानासाठी भाविकांची अगोदरच गर्दी झालेली होती. तसेच येथील नीलकंठेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, टाळकुठेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी केलेली होती. तसेच ज्या ठिकाणी शिवलिंग आहेत, अशा कुंडांवर शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही तिरावर आज यात्रेचे स्वरुप होते.

भजन, कीर्तनाचे आयोजन : घारपुरे घाट येथे सिद्धेश्वर मंदिरात दिवसभर भाविकांची दर्शनासाठी रिघ होती.या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केल्यामूळे वाहतूकीला वळवण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत होती. शिवभक्ताना जागोजोगी फराळ वाटप करण्यात येत होते. तर काही ठिकाणी प्रवचन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले होते. सिद्धेश्वर मंदिरात भक्तांकडून पुजाविधी करण्यासाठी मोठी रांग लागलेली होती.

LEAVE A REPLY

*