पंचवटीत एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा अयशस्वी प्रयत्न

0
नाशिक | दि. २९ प्रतिनिधी – पंचवटीतील ड्रीम कॅसल भागात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नव्याने बसविण्यात आलेले एटीएम रविवारी (द़ि २६) रात्री फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़  या प्रकरणी बँकेच्या अधिकारी अशोका मार्गावरील आम्रपाली टॉवरमधील रहिवासी संगीता म्हात्रे यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील मोरे मळ्याजवळ असलेल्या ड्रीम कॅसल सोसायटीच्या चौदा नंबरच्या गाळ्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे़ रविवारी रात्री ८ ते सोमवारी सोमवारी सकाळी १० वाजेच्या कालावधीत चोरट्यांनी एटीएम तोडून त्यामधील कॅश चोरण्याचा प्रयत्न केला़ मात्र चोरट्यांना त्यात यश आले नाही़.

या प्रकरणी म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत़

LEAVE A REPLY

*