Type to search

Featured आवर्जून वाचाच देश विदेश फिचर्स मुख्य बातम्या

हे आहेत जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट; भारताचा नंबर कुठे जाणून घ्या

Share

देशदूत डिजिटल 

नवी दिल्ली | प्रतिनिधी

जगात कुठेही फिरण्यासाठी जायचे असल्यास स्व:त जवळ पासपोर्ट असणे आवश्यक असते. परंतु काही देशांचे पासपोर्ट खूप महत्वाचे मानले जातात. याद्वारे जगात कुठेही गेले तरी या नागरिकांना कुठलाही त्रास  होत नाही.

हेनले पासपोर्ट इंडेक्सने यावर्षीच्या सर्वात महत्वपूर्ण पासपोर्टची सूची नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सर्वात महत्वाच्या पासपोर्टसची माहिती देण्यात आली आहे. याद्वारे जगातील जपान आणि सिंगापूर देशाचे पासपोर्ट सर्वात महत्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे. या पासपोर्टवर १८९ देशांत फिरण्यासाठी जाऊ शकतात तेही बिगर व्हिजाचे.

मागील वर्षी २०१८ मध्ये जर्मनीच्या पासपोर्टला सर्वात महत्वपूर्ण पासपोर्टचा दर्जा देण्यात आला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सच्या सूचित भारत ८६ व्या नंबरवर आहे व त्याचा मोबिलीटी स्कोर ५८ आहे. याचा अर्थ जर तुमच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल तर तुम्ही विना व्हिजाचे ५८ देशांत जाऊ शकतात.

हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये १९९ पासपोर्ट आणि २२७ पर्यटनस्थळाचा उल्लेख आहे. यासूचीमध्ये  युनाइटेड किंगडम, अमेरिका, बेल्जियम, कँनडा, ग्रीस, आयलँड आणि नॉर्वे समवेत आठ देश सहाव्या स्थानी आहे. तसेच डेनमार्क, इटली आणि लग्‍जमबर्ग तिसऱ्या स्थानी आहे. तर फ्रांस, स्‍पेन आणि स्‍वीडन चौथ्या स्थानी आहेत.

याव्यतिरिक्त इराक आणि अफगानिस्‍तान या सूचीत  सर्वात शेवटच्या स्थानी आहेत. इराकी देशाचे नागरिक विनाव्हीजाचे २७ आणि अफगाणी २५ देशांत यात्रा करू शकतात.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!