अशी आहेत डेंग्यूची लक्षणे, असा करा उपाय…

0

नाशिक (मयुर हिवाळे) | नाशिक शहरात सध्या डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

नाशिक महानगरपालिका डेंग्युचा सामना करण्यासाठी उपाययोजना करतांना दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या काय-काय उपाययोजना आहेत हे जाणुन घेण्यासाठी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. विजय बुकाने यांच्याशी साधलेला संवाद…

डॉ. सुनील बुकाणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, नाशिक महानगरपालिका

डेंग्यु कशाप्रकारे होतो? व त्याची प्राथमिक लक्षणे ?

डेंग्यु हा रोग डासापासुन होत नसुन तो विषाणुपासुन होतो. परंतु त्या रोगाचा प्रसार हा डासामार्फत होत असतो. साधारणत: विविध प्रकारच्या डासांच्या प्रजातीपैकी एडीस नावाच्या डासामुळे हा प्रसार होतो. ज्या डेंग्युग्रस्त रुग्णाला हा डास चावतो, त्या रुग्णाच्या शरीरातील रक्त डास हा डेंग्यु विषाणुयुक्त डास दुसर्‍या निरोगी व्यक्तीला चावतांना त्याची लाळ निरोगी व्यक्तीच्या त्वचेवर सोडतो.

रक्त शोषण्यासाठी त्वचेला छिद्र करतो आणि रक्त शोषतो. स्कीनवर सोडलेल्या लाळेमधील विषाणु निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात  साधारणत: 3 ते 6 दिवसांमध्ये विषाणुची वाढ होते व लक्षणे दिसावयास लागतात.

हि आहेत लक्षणे : ताप येणे, जॉईंटस दुखणे, सांधे दुखणे, डोकेदुखी, शरीर ठनकणे, डोळे खुपणे , शरीरात विषाणुंची वाढ मोठ्या प्रमाणावर झाल्यास शरीरावर लाल चट्टे दिसणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसतात. गंभीर लक्षणे – छातीत पाणी जमा होणे, पोटात पाणी जमा होणे, नाकातुन, तोंडातुन रक्त येणे, शौचास रक्त पडणे.

डेंग्युवर नियंत्रण मिळविण्यासाठीच्या उपाययोजना…

हा रोग बर्‍याचदा शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे बरापण होतो. मात्र रुग्णाच्या शरीरातील पांढर्‍या पेशी कमी झाल्यास रोग बळावु शकतो.

हा रोग विषाणुपासुन होत असल्याने यावर निश्चित अशी ट्रीटमेंट उपलब्ध नाही परंतु सर्वसाधारणपणे रुग्णास बेडरेस्ट, ताप कमी होण्यासाठी तापनाशक गोळी घेणे, शरीर कोमट पाण्याने स्वच्छ करणे, अंगदुखीवर गोळी घेणे, आवश्यकतेनुसार उपचार, भरपुर तरल पदार्थ खाणे.

डेंग्युला प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना करायला हव्यात ?

एडिस जातीचा मादी डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होत असते तेव्हा असे पाणी डबके, घरांची छते, भंगारच्या ठिकाणी, झाडांच्या कुंड्या, फ्रीजच्या मागील भागात, फीश टँक याठिकाणी पाणी साचु न देणे. घरातील माठ, पिंप, सिन्टेक्सच्या टाकीला झाकण लावणे तसेच दर दोन तीन दिवसांत त्यातील पाणी बदलणे.

नाशिक महानगरपालिकेकडुन डेंग्युला प्रतिबंध करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत?

नाशिक महानगरपालिका डेंग्युला प्रतिबंध करण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्न करीत आहे. डेंग्यु प्रतिबंधक जनजागृतीसाठी वर्तमानपत्रातुन, पोस्टरद्वारे, पॅम्पलेटद्वारे, रेडीओवरुन, केबलवरुन, लाऊड स्पीकर द्वारे जाहीर आवाहन करण्यात येत आहे. तसेच पालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन लोकजागृती करीत आहेत.

पावसाळ्यात दक्षता घेण्यास सांगत आहे. सोबत भंगारची दुकानांना नोटीसा बजाविणे, शाळांमध्ये पत्रके वाटणे, ऑफिस परिसरांना सुचित करणे अशा प्रकारच्या योजना करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

*