हे आहेत देशातील १४ भोंदू बाबा; आखाडा परिषदेकडून यादी जाहीर

0
स्वयंघोषित आध्यात्मिक साधूंचे एक-एक प्रकार समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुरमीत राम रहीम प्रकरणानंतर तातडीने अखिल भारतीय आखाडा परिषदेकडून अलाहाबाद येथे आज बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत १४ भोंदू साधूंची यादी जाहीर करण्यात आली.

यात अनेक दिवसांपासून कारागृहात असलेले आसाराम, गुरमीत राम रहीम, राधे मां, नारायण साई, रामपाल यांच्यासह अनेकांचा यादीत समावेश आहे.

बैठकीदरम्यान, अशा ढोंगी, नकली साधूंपासून नागरिकांनी सावध रहावे असेही आवाहनदेखील आखाडा परिषदेकडून यावेळी करण्यात आले. अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या आजच्या बैठकीला देशातील १३ प्रमुख आखाड्यांमधील साधू-संतांचा समावेश होता.

अशी आहे ढोंगी साधूंची लिस्ट : आसाराम, राधे मां, सच्चिदानंद गिरी, गुरमीत राम रहीम, ओमबाबा, निर्मल बाबा, इच्छाधारी भीमानंद, स्वामी असीमानंद, ओम नमः शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, आचार्य कुशमुनि, बृहस्तपति गिरि आणि मलखान सिंह.

LEAVE A REPLY

*