Type to search

नाशिक : मतमोजणीत कोणताही गोंधळ नाही; मतमोजणी प्रक्रिया सुरळीत : जिल्हाधिकारी

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

नाशिक : मतमोजणीत कोणताही गोंधळ नाही; मतमोजणी प्रक्रिया सुरळीत : जिल्हाधिकारी

Share

नाशिक : नाशिक लोकसभा मतमोजणी प्रकिया सुरु झाली असून पहिली फेरी पार पडली आहे. मतमोजणीच्या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रतिनिधींनी घेतली हरकत घेतली होती.

प्रत्यक्ष मतदानापेक्षा मशीन मध्ये झालेले मतदान जास्त असल्याचा आरोप त्यांनी केला होता.दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणीबाबत कोणताही गोंधळ नसून प्रक्रिया सुरळित सुरु असल्याची माहिती दिली आहे.

पहिल्या फेरीनंतर नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ मधील बूथ क्रमांक १५ मधील ईव्हीएम मशीन मध्ये प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मशीन मधील मतदान आकडेवारी तफावत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या प्रतिनिधींनी केला.

३४२ प्रत्यक्ष मतदान झाले आहे तर मशीनमध्ये ५५३ मतदान दाखवीत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. दरम्यान,  या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मतमोजणी सुरळीत असल्याची माहिती दिली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!