‘एनडीएसटी’त गोंधळ कायम

0

नाशिक : नाशिक डिस्ट्रीक्ट सेकंडरी टीचर्स (एनडीएसटी) क्रेडिट सोसायटीच्या सभासदांनी वार्षिक सभेत गोंधळाची परंपरा कायम राखली.

सभेच्या व्यासपीठाचा राजकीय आरोप-प्रत्यारोपांसाठी वापर केल्याने प्रशासकांनी सभा गुंडाळली. सभेत केवळ ठराविक सदस्यांनाच बोलण्याची संधी दिली जात असल्याचा राग आल्याने एकाने भर सभेत चप्पल उगारली.

त्यामुळे काही काळ एकच गोंधळ निर्माण झाला. सभासदांच्या या गोंधळातच महत्त्वाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली. कर्जावरील व्याजदरात तब्बल एक टक्का कपात झाल्याने सोसायटीच्या 12 हजार सभासदांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

बैठकीत झालेले ठराव –

– एनडीएसटीच्या व्याजदरात एक टक्के कपात़
– संगणक खरेदीत भ्रष्टाचार झाला असून, त्याची चौकशी करावी.
– 2017-18 च्या 21 कोटी 3 लाख 50 हजार रुपये अंदाजपत्रास मंजुरी.
– लेखा परीक्षणासाठी लेखा परीक्षक वर्ग – 1 दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा.
– सभासदांकडे थकित कर्जाची त्वरित वसुली करावी.
– एनडीएसटी सोसायटीचे नाव यापुढे ’नॉनटीचिंग एम्प्लॉई’ (एनडीएसटी ण्ड एनटी) असे राहील.

LEAVE A REPLY

*